डोईवर भार …..

डोईवर भार ….

भार डोई जड़ व्हावा,

आता ना तो सोसावा..,

बोलून तो मुक्त व्हावा,

नाहि कूणाचा वाढावा ।।१।।

बोलताना तो आढावा,

खोल वर्मीचा जाणावा,

नाहि कूणा रोष यावा…

बोलून तो मुक्त व्हावा ।।२।।

सभ्यता-संस्कार चार,

घरात वेगळे फ़ार …

वर्मीला मागचे दार,

मूक्कामी पाहूणे चार ।।३।।

⁃ सौ. अपर्णा काकिर्डे.

Continue Reading

आघात

आघात

आघात होत गेला

मी आत उमलत गेले

कळी कळी बनूनी

तो घाव सोसत गेले….

घाव झेलता झेलता

जखमेचा पाझर फुटला

रक्तरंजीत लालीचा

काटेरी श्रृंगार सजला…

मायेचा स्पर्श नको मला

ती ऊबही आता सोसवेना

रक्त गोठता गोठता

ती थंड ओढ़ही बोलवेना …

– अपर्णा काकिर्डे.

Continue Reading

काहूर

काहूर…

मनाचे गं रान….

मन काहूर काहूर।

चींती असे ध्यान,

संयमी निरंतर…! ।।१।।

मनाच्या रानात फार,

काळोख काळोख…,

अनोळखी भास तो,

गर्द रानाची ओळख ।।२।।

ध्यासाचा तो उजेड…..

ओल्या पाचूच्या रानात,

दिसू लागे पानोपान..

शुभ्र कवडश्या मनात ।।३।।

-अपर्णा काकिर्डे.

Continue Reading

माणसांची पोकळी

माणसांची पोकळी….

“माणसं कधीच जात नसतात

आठवणींमधे फिरत असतात!

तीच्यात माणसं गुंतत जातात,

भावनाभावनाच पेरत जातात!

मायेच्या ऊबी अंकूरून येतात,

कळीकळ्यात बहरून जातात!

पोकळीपोकळीत भरून येतात,

ऊनसावलीतच डोलू लागतात!

माऊलीमाणसं बघत असतात,

लेकरांच्या सूखी धन्य होतात!”

– सौ. अपर्णा काकिर्डे.

Continue Reading

मन बागडे


मनं बागडे फुलपाखराचे 

चतूर दृष्टि राही

पात्यांवरच्या दवबिंदूचे

तळे डोळस पाही

व्याकूळ तृष्णा खोल मनाची

तृप्त होऊनी जाई

पात्यापात्यांमधूनीच काही

खोली शोधत जाई।

एक द्वार त्या उड्डाणाचे….

एक द्वार त्या उड्डाणाचे

पंख देऊनी जाई

पंख अभेदी गरूड़भरारी

नीळ्या अथांगी जाई।

 – अपर्णा

Continue Reading

Birthday

On Sept 12th I celebrate the day of me becoming a Mother… I see my baby is growing so fast…. I am happy but I feel sad deep inside somewhere….It’s hard to accept that my baby is grown so big… My heart is heavy denying the fact ….Tears come out…. may be to ruin my “special” occasion….. she doesn’t know but that invites her …..she wants to play …and I can’t deny at this time …but I am not ready…I am tired….very tired ….This time it’s very hard now to convince her….I know she’s little stubborn…she wants to play…But no! I can’t!… So I just close the eyes and look back at her …I see a little frown on her forehead and thoughts in her eyes ….I love her eyes…those are precious to me! But..I don’t like that frown … So I just kiss on her warm forehead….the crease is gone…and the smile giggles on her little face …..And suddenly to my surprise I see the baby back ….when I saw into her deep eyes ….It’s magic! …magic in eyes!…I found my baby back!…She is not gone anywhere. She’s here…right here!….In the eyes….I found my baby! 

Continue Reading

घालमेल…

एक समुद्र दाटले मी

नदीनदी घूसळले मी

नीलकंठा स्मरले मी

विषयघडा सूटले मी

तप्तकोर मावळले मी

अमृतथेंबा सावरले मी!

Continue Reading

अडकलेली व्यथा!

अडकलेली व्यथा!

 

सांगून नाही कळणार,

तूला माझी व्यथा!

सांगूनही उपयोग काय?!

तूला तर माहितच

नाहिए माझी कथा…!

इवलेसे अश्रु …..

दिसतातच लगे तूला…

काय झालय?! का रडतेस?!

असं विचारतोसही मला….

पण खरच सांगते…,

सांगून नाही कळणार…

तुला माझा ओलावा!

कारण पाहू शकतोस तू…

फक्त सागराचा किनारा!

गच्च मिटलेले ओठ….

आणि डोळे…

सारे काही दिसूं शकते तूला….,

तेंव्हा हळूच चोरून,

पूसतोसही मला…

“काय झालय?” ….

“काय त्रास होतोय?”….

……,……

पण खरच सांगते…

सांगून नाही कळणार….,

तूला माझ्या रेषा…

कारण त्या लिहील्याच

अशा आहेत की….,

कळूच नये तूला !

  • सौ. अपर्णा नि. काकिर्डे.
Continue Reading

डाव बुद्धीबळाचा

डाव बुद्धीबळाचा

डाव मांडला बुद्धीबळाचा,

हत्ती, घोडे, महारथींचा…।।

विषय थोडका, नीत्त्य वेगळा,

एककटाक्षी न दिसे कूणाला।

डाव रंगला, विषय दंगला…

हत्तीघोड्यांसवे उंटही गूंतला।

वज़ीर कूणाचा, विषय थोडका,

“कोण-वाचावा” हा प्रश्न नेमका।

विषयच मूळी आक्रमणाचा

अन् पर्वाही नसे कोण-कूणाचा!!

डाव संपला भासे मनाला…

पुन्हा जींकणे न उरे कूणाला!!

हार जिंकणे न ठाव मनाला

खेळ संपला हेच सांगे जीवाला।।

  • सौ. अपर्णा काकिर्डे
Continue Reading

सांग दर्पणा…..

 सांग दर्पणा…..

सांग दर्पणा कशी मी दिसते,

नाते तूझ्याशी जगावेगळे……

गोपीकांचा मुरलीधर तू,

तुला कूणीही सखा नसे अन्

राधिकाही तुझी नसे….

सांग दर्पणा कशी मी दिसते?

योगीयांचाही योगेश्वर तू

असत्याशी कधी संग नसे 

अन् सत्याचाही गर्व नसे

सांग दर्पणा कशी मी असे….

देवघरात कूणी तूला न पूजे,

माजघराची तू शान असे…

भावनेलाही भावुक करूनी, 

मेनकेचा तू वैरागी असे…

प्रभातकिरणे तुला स्पर्शूनी 

धन्य होऊनी नव उज़ळीतसे

ज्ञानीयांचाही ज्ञानेश्वर तू

अप्सरेच्या महाली वसे 

सांग दर्पणा कशी मी दिसे!!

नीतळ नीरासम अस्तित्व तूझे

हे खडा मारीता मोडीत असे

कटियार बनूनी मग भाविकेला 

नवे रूप तुझे दावीतसे….

सांग दर्पणा कशी मी दिसे?

  • अपर्णा काकिर्डे
Continue Reading