अडकलेली व्यथा!
सांगून नाही कळणार,
तूला माझी व्यथा!
सांगूनही उपयोग काय?!
तूला तर माहितच
नाहिए माझी कथा…!
इवलेसे अश्रु …..
दिसतातच लगे तूला…
काय झालय?! का रडतेस?!
असं विचारतोसही मला….
पण खरच सांगते…,
सांगून नाही कळणार…
तुला माझा ओलावा!
कारण पाहू शकतोस तू…
फक्त सागराचा किनारा!
गच्च मिटलेले ओठ….
आणि डोळे…
सारे काही दिसूं शकते तूला….,
तेंव्हा हळूच चोरून,
पूसतोसही मला…
“काय झालय?” ….
“काय त्रास होतोय?”….
……,……
पण खरच सांगते…
सांगून नाही कळणार….,
तूला माझ्या रेषा…
कारण त्या लिहील्याच
अशा आहेत की….,
कळूच नये तूला !
- सौ. अपर्णा नि. काकिर्डे.