आघात
आघात होत गेला
मी आत उमलत गेले
कळी कळी बनूनी
तो घाव सोसत गेले….
घाव झेलता झेलता
जखमेचा पाझर फुटला
रक्तरंजीत लालीचा
काटेरी श्रृंगार सजला…
मायेचा स्पर्श नको मला
ती ऊबही आता सोसवेना
रक्त गोठता गोठता
ती थंड ओढ़ही बोलवेना …
– अपर्णा काकिर्डे.