सांग दर्पणा…..
सांग दर्पणा कशी मी दिसते,
नाते तूझ्याशी जगावेगळे……
गोपीकांचा मुरलीधर तू,
तुला कूणीही सखा नसे अन्
राधिकाही तुझी नसे….
सांग दर्पणा कशी मी दिसते?
योगीयांचाही योगेश्वर तू
असत्याशी कधी संग नसे
अन् सत्याचाही गर्व नसे
सांग दर्पणा कशी मी असे….
देवघरात कूणी तूला न पूजे,
माजघराची तू शान असे…
भावनेलाही भावुक करूनी,
मेनकेचा तू वैरागी असे…
प्रभातकिरणे तुला स्पर्शूनी
धन्य होऊनी नव उज़ळीतसे
ज्ञानीयांचाही ज्ञानेश्वर तू
अप्सरेच्या महाली वसे
सांग दर्पणा कशी मी दिसे!!
नीतळ नीरासम अस्तित्व तूझे
हे खडा मारीता मोडीत असे
कटियार बनूनी मग भाविकेला
नवे रूप तुझे दावीतसे….
सांग दर्पणा कशी मी दिसे?
- अपर्णा काकिर्डे